गडचिरोली : १३ ऑक्टोबर २०२५
आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ५१ निवडणूक विभागांसाठी आरक्षण सोडत आज, सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.
ही सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ही आरक्षण सोडत “महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५” नुसार करण्यात आली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) हेमंत मोहरे व सहाय्यक महसूल अधिकारी प्रशांत चिटमलवार उपस्थित होते.
आरक्षण सोडतीच्या या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील निवडणूक लढतीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे.
📋 ५१ विभागांसाठी आरक्षणाचा तपशील…
1 कोरची कोटरा-बिहिटेकला, अनुसूचित जमाती-महिला
2 कोरची बेडगाव-कोटगुल, अनुसूचित जमाती
3 कुरखेडा पलसगड-पुराडा, अनुसूचित जमाती
4 कुरखेडा तळेगाव-वडेगाव, अनुसूचित जमाती
5 कुरखेडा गेवर्धा-गोठणगाव, नामनिर्देशित-महिला
6 कुरखेडा कढोली-सावलखेडा, अनुसूचित जमाती
7 कुरखेडा अंगारा-येंगलखेडा, अनुसूचित जमाती-महिला
8 देसाईगंज कोरेगाव-डोंगरगाव (हलबी), नामनिर्देशित
9 देसाईगंज विसोरा-सांवगी, नामनिर्देशित-महिला
10 देसाईगंज कुरुड-कोकडी, सर्वसाधारण
11 आरमोरी वैरागड-मानापूर, अनुसूचित जमाती-महिला
12 आरमोरी पळसगाव-जोगीसाखरा, नामनिर्देशित
13 आरमोरी ठाणेगाव-इंजेवारी, सर्वसाधारण
14 आरमोरी सिर्सी-वडधा, अनुसूचित जमाती
15 धानोरा मुस्का-मुरुमगाव, अनुसूचित जमाती-महिला
16 धानोरा येरकड-रांगी, अनुसूचित जमाती-महिला
17 धानोरा चातगाव-कारवाफा, अनुसूचित जमाती
18 धानोरा पेंढरी-गट्टा, अनुसूचित जमाती
19 गडचिरोली मौशिखांब-मुरमाडी, नामनिर्देशित
20 गडचिरोली वसा-पोर्ला, नामनिर्देशित-महिला
21 गडचिरोली कोटगल-मुरखळा, अनुसूचित जाती
22 गडचिरोली जेप्रा-विहिरगाव, नामनिर्देशित
23 गडचिरोली मुडझा-येवली, नामनिर्देशित-महिला
24 चामोर्शी कुनघाडा रै-तळोधी मो., सर्वसाधारण-महिला
25 चामोर्शी विसापूर रै-कुरुळ, सर्वसाधारण-महिला
26 चामोर्शी विक्रमपूर-फराडा, नामनिर्देशित-महिला
27 चामोर्शी भेंडाळा-मुरखळा, नामनिर्देशित
28 चामोर्शी लखमापूर बोरी-गणपूर रै, नामनिर्देशित
29 चामोर्शी हळदवाही-रेगडी, सर्वसाधारण
30 चामोर्शी घोट-सुभाषग्राम, सर्वसाधारण-महिला
31 चामोर्शी दुर्गापूर-वायगाव, सर्वसाधारण-महिला
32 चामोर्शी आष्टी-इल्लूर, सर्वसाधारण
33 मुलचेरा कालीनगर-विवेकानंदपूर, नामनिर्देशित-महिला
34 मुलचेरा सुंदरनगर-गोमणी, सर्वसाधारण-महिला
35 मुलचेरा कोठारी-शांतीग्राम, नामनिर्देशित-महिला
36 एटापल्ली जारावंडी-कसनसूर, अनुसूचित जमाती
37 एटापल्ली गट्टा-हेडरी, अनुसूचित जमाती
38 एटापल्ली गेदा-हालेवारा, अनुसूचित जमाती-महिला
39 एटापल्ली पंदेवाही स.-बुर्गी स., अनुसूचित जमाती-महिला
40 भामरागड आरेवाडा-लाहेरी, अनुसूचित जमाती
41 भामरागड कोठी-येचली, अनुसूचित जमाती-महिला
42 अहेरी खमनचेरू-नागेपल्ली, अनुसूचित जमाती-महिला
43 अहेरी वेलगुर-आलापल्ली, सर्वसाधारण
44 अहेरी महागांव-देवलमारी, अनुसूचित जमाती
45 अहेरी पेरमीली-राजाराम, अनुसूचित जमाती-महिला
46 अहेरी रेपनपल्ली-उमानूर, अनुसूचित जाती
47 अहेरी जिमलगट्टा-पेठा, अनुसूचित जमाती-महिला
48 सिरोंचा झिगांनूर-आसरअल्ली, सर्वसाधारण
49 सिरोंचा विठ्ठलरावपेठा माल-जाफ्राबाद चेक, अनुसूचित जाती-महिला
50 सिरोंचा नारायणपूर-जानमपल्ली, अनुसूचित जाती-महिला.
51 सिरोंचा लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा माल, अनुसूचित जाती-महिला.
आरक्षण निश्चितीनंतर आता सर्वांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील सूचनांकडे व प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.
या आरक्षणामुळे काही विद्यमान सदस्यांना नव्या मतदारसंघातून उमेदवारी करावी लागू शकते, तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
