०२ पिकअप वाहन व १४ गोवंशीय जनावरांसह एकूण ९,१५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
गडचिरोली जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिनांक २६/०८/२०२४ रोजी दोन पिकअप वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन गोडलवाही वरुन गडचिरोली मार्गे घेऊन जाणार आहे. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस पथकाने गोडलवाही फाटा धानोरा मार्गावर सापळा रचुन पाळत ठेवली असता, दोन पिकअप वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आले. त्यावेळेस सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवून सदर वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले.
वाहन क्रमांक एमएच ३४ बी.जी. ५१५२ महिंद्रा इंम्पेरीओ पिक अप ज्याचा चालक नामे प्रतिक डंबाजी बांबोळे रा. उसेगाव ता. सावली जि. चंद्रपुर यांचे ताब्यातील वाहनात ०२ बैल तसेच ०५ गायी त्याचप्रमाणे वाहन क्रमांक एमएच ३४ बी. झेड. ४९०४ ज्याचा चालक नामे भुवन नामदेव सोनुले वय ३७ वर्षे रा. सावली ता. सावली जि. चंद्रपुर याचे ताब्यातील वाहनात ०४ बैल व ०३ गायी असे एकुण दोन्ही चारचाकी वाहनात १४ जनावरे ज्यांची किमत १,१५,०००/- रुपये किमतीचे जनावरे व दोन पिकअप वाहन अंदाजे किमत प्रत्येकी ४,००,०००/- रुपये प्रमाणे एकुण ८,००,०००/- असा एकुण ९,१५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे १) प्रतिक डंबाजी बांबोळे रा. उसेगाव ता. सावली जि. चंद्रपुर २) भुवन नामदेव सोनुले वय ३७ वर्षे रा. सावली ता. सावली जि. चंद्रपुर तसेच पाहिजे आरोपी नामे ३) गोलु फाले रा. पारडी ता. सावली जि. चंद्रपुर यांच्यावर पोलीस स्टेशन, धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.