Home ब्रेकिंग न्यूज नगर पालिकेच्या घंटा गाड्या बिगर नोंदणी आणि नंबर प्लेट शिवाय सुरू…

नगर पालिकेच्या घंटा गाड्या बिगर नोंदणी आणि नंबर प्लेट शिवाय सुरू…

0
456
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 32;

गडचिरोली:शहरात साफसफाई करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नगर पालिकेची असते परंतु चार चार महिने साफसफाई कडे दुर्लक्ष करून कचरा उचलणाऱ्या तसेच इंधनावर चालणाऱ्या चारचाकी वाहनांना च नंबर प्लेट व परिवहन कायद्याने नोंदणीच केली नसल्याची लाजीरवाणी बाबा आज गडचिरोली शहरात उघडकीस आली.

या बाबत सविस्तर माहिती घेतली असता साफसफाई चे कार्य अमरावतीच्या खासगी व्यक्ती दीपक उत्तराधी यांना जवळपास महिन्यापोटी 24 ते 25 लाख रुपयाला देण्यात आले असून त्यांनी सदरचे कार्य सब टेंडर पद्धतीने अख्तर ढाकीवाला यांना सोपविलेले असल्याची माहिती मिळाली आहे,या साफसफाई च्या ठेकेदार व्यक्ती फक्त 4 ट्रॅक्टर भाड्याने घेतलेली असून बाकी सर्व कामाकरीता नगर पालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या 10 ऑटो टिप्पर,13 घंटा रिक्षा गाडी, व 1 ई रिक्षा असे एकूण 24 वाहने सदर ठेकेदाराला देण्यात आलेल्या असून त्यापोटी सर्व वाहनांचे 62500 रुपये मासिक भाडे गडचिरोली नगर पालिकेला ठेकेदाराला देणे बंधनकारक असल्याची माहिती समोर आली आहे.

 

करोडो रुपयांची वाहने घेऊन त्या वाहनांना नोंदणी न करता ठेकेदाराला सुपूर्द करून फक्त 62500 रुपये भाडे कपात करून घेण्यातच नगर पालिकेला धन्यता वाटत असल्याने सदर कामात मोठी देवाण घेवाण होत असल्याची शक्यता शहरातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

अशा प्रकारे करोड रुपये खर्च करून त्या पोटी फक्त 62500 रुपये भाडे ठेकेदारा कडून घेतले जात असल्याने काही तरी मोठा घबाड होत असून याची कठोर चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

नगर पालिकेच्या साफसफाई च्या कामात वापरल्या जाणारी वाहने नोंदणी नसल्याची माहिती मिळाली असता शहरातील वाहतूक विभागाने इंदिरा गांधी चौकात ही वाहने थांबवून चौकशी केली असता सदर ची माहितीत सत्यता होती पण सदर वाहने चालविणारी व्यक्ती ही बिगर सीट बेल्ट न लावताच ही वाहने चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.अशा वेळी सरकारी वाहने जर का बेकादेशीरपणे रस्त्यावर उतरल्यास तसेच या वाहनांमुळे काही अपघात घडल्यास त्यांच्या वाहनांवर नंबरच नसल्याने कायदेशीर कारवाई करतांना अडचण निर्माण होणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस प्रभारी शरद मेश्राम यांनी सांगितली असून नगर पालिकेला सर्व वाहनांचे नोंदणी करून नंबर प्लेट लावूनच वापर करण्याचे लिखित पत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बाबत नगर पालिकेच्या आरोग्य व साफसफाई विभागाचे प्रमुख अधिकारी चंद्रशेखर भगत यांना वाहतूक विभागाने घटनास्थळी बोलून सदर माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी सदरचे चे वाहन परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेले असून सदर चे वाहन कंपनी कडून विकत घेतल्या नंबर सदर वाहनांना ऑटो टिप्पर ही नाव देण्यात आले असून ते वाहन कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी म्हणून दाखविण्यात आले नसल्याने परिवहन कायद्याने नोंदणी होत नसल्याचे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.ही वाहने नोंदणी शिवाय सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा यांना देण्यात आली असून या बाबत जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलेले आहे.

सदर वाहनांना नोंदणी न करताच नगर पालिकेच्या वतीने वापर होत असल्याची माहिती परिवहन अधिकारी अक्षय सोलंकी यांना दिली असता त्यांनी सदर ची वाहने नोंदणी करण्यासाठी फक्त 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो परंतु नगर पालिकेने कायदेशीर कागदांची पूर्तता केली नसल्याचे सदर ची वाहने नोंदणी केली नसल्याची लाजीरवाणी बाबा त्यांनी सांगितली.

 

नगर पालिके सारखी स्वराज्य स्थानिक संस्थाच जर परिवहन व वाहतूक कायद्याचे पालन करणार नसेल तर अशा वेळी सर्व सामान्य नागरिकांनी कोणाकडे जाऊन दाद मागायची ही विचार करणारी परिस्थिती आज पहायला मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here