Home ब्रेकिंग न्यूज शिवाजी कॉलेज समोरील मैदानात शीख तरुणाचा मृतदेह आढळला… मृतकाच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका...

शिवाजी कॉलेज समोरील मैदानात शीख तरुणाचा मृतदेह आढळला… मृतकाच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केली…?

0
1046

 

गडचिरोली : शहरातील धानोरा रोडवरील शिवाजी कॉलेजसमोरील मारलीवार यांच्या खुल्या मैदानात एका २४ वर्षीय  शीख तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव हरबचनसिंग खन्ना सिंग पटवा (वय २४, रा. गोकुळ नगर) असे आहे. त्याच्या नाक, तोंड तसेच गुप्तांगातून रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण संशयास्पद असल्याची शक्यता मृतकाचे नातेवाईकांनी  व्यक्त केली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या करून मृतदेह मैदानात फेकल्याचा संशय व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी येऊन सखोल तपास सुरू केला.

घटनास्थळी कोणतेही हत्यार किंवा संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, मृतकाची दुचाकी वाहन चावी लावलेल्या अवस्थेत उभी आढळल्याने या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

सदर मैदान हे शहरातील वर्दळीच्या वस्तीच्या जवळ असल्याने या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी व्यायाम व खेळण्यासाठी आलेल्या काही मुलांना सर्वप्रथम मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती कुटुंबीयांना व पोलिसांना दिली.

सध्या गडचिरोली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here