गडचिरोली : शहरात सध्या दागिन्यांच्या खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचा नामांकित ज्वेलरी ब्रँड रोकडे ज्वेलर्स आपल्या बहुप्रतीक्षित ‘ज्वेलसूत्र’ प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गडचिरोलीकरांच्या भेटीला आला आहे. चंद्रपूर रोडवरील हॉटेल लँडमार्क येथे ११ व १२ एप्रिल दरम्यान आयोजित या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले असून, पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून जबरदस्त प्रतिसाद दिला.
अक्षय तृतीया या शुभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनामुळे सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात गडचिरोलीसह परिसरातील मोठ्या संख्येने कुटुंबांनी सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन पारंपरिक दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रणोती निंबोलकर, अस्मिता मोरे, कविता पोरेडीवार, छाया खूने, संदीप धायत, सुनील सोनटक्के, रहीम डोडिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांसाठी ही एक उत्कृष्ट संधी असल्याचे मत व्यक्त केले.
पहिल्याच दिवशी ग्राहकांचा विश्वास दृढ…
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली. यामुळे रोकडे ज्वेलर्स प्रति असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. ग्राहकांनी पारदर्शक दररचना, जुन्या सोन्याची सुलभ देवाणघेवाण तसेच तज्ज्ञांकडून मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शन यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी रोकडे ज्वेलर्सचे संचालक पारस रोकडे म्हणाले,
“गडचिरोलीतून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. ‘ज्वेलसूत्र’ हे केवळ प्रदर्शन नसून ग्राहकांशी नाते अधिक दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे.”
आकर्षक ऑफर्समुळे खरेदीला चालना…
या प्रदर्शनात ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत—
सोने व चांदीच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेसमध्ये २५% पर्यंत सूट
डायमंड ज्वेलरीवर मेकिंग चार्जेसमध्ये १००% सूट
गोल्ड व डायमंड सेव्हिंग स्कीमच्या पहिल्या हप्त्यावर २५% लाभ
जुन्या सोन्याच्या बदल्यात १०१% पर्यंत मूल्य
या ऑफर्समुळे ग्राहकांना अधिक लाभदायक खरेदीची संधी मिळत असून, मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
आज शेवटचा दिवस, नागरिकांनी घ्यावा लाभ…
‘ज्वेलसूत्र’ हे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन १२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप या प्रदर्शनाला भेट दिलेली नाही, त्यांच्यासाठी हा शेवटचा दिवस असून आधुनिक डिझाइन्स, आकर्षक ऑफर्स आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.




