Home शैक्षणिक राणी दुर्गावती विद्यालय, आलापली व दृष्टी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू...

राणी दुर्गावती विद्यालय, आलापली व दृष्टी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न…

0
145

 

आलापली (प्रतिनिधी):

महिलांमध्ये सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा, परंपरांचे जतन व्हावे तसेच भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने राणी दुर्गावती विद्यालय, आलापली व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शाहीनताई हकीम या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून केकिता बाळापुरे, प्राजक्ता विजय चौहान, गीता ताई दुर्गे तसेच राणी दुर्गावती महाविद्यालयाचे प्राचार्य लोनबले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना कश्यप मॅडम यांनी करताना हळदी-कुंकू कार्यक्रमाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. महिलांमध्ये स्नेहभाव, आपुलकी व परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिलांना पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या, आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला. पारंपरिक गाणी, आपुलकीचे संवाद आणि हास्यविनोदामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी टेपाले मॅडम यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे, शिक्षकवर्गाचे तसेच उपस्थित महिलांचे मनःपूर्वक आभार मानले.

राणी दुर्गावती विद्यालय व दृष्टी फाउंडेशन यांच्या या संयुक्त उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी, सकारात्मक ऊर्जा व सांस्कृतिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या आणि उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here