गडचिरोली :
आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे या तिन्ही पक्षांच्या महाआघाडीकडून आज ताकदवान उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
यात नगरपरिषद अध्यक्षपदासाठी बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे यांच्या नावाची घोषणा होताच संपूर्ण शहराचे राजकारण अधिकच चुरशीचे झाले आहे.

महाआघाडीनं या निवडणुकीत महिला, युवक, मागासवर्ग, ओबीसी आणि आदिवासी समाजाच्या प्रतिनिधित्वाला स्पष्ट प्राधान्य देत संतुलित, प्रभावी आणि स्थानिक समस्यांवर काम करणार्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांची अधिकृत घोषणा…
प्रभाग क्र. 1 (ब)
प्रशांत शामराव आखाडे
माजी नगरसेवक असलेले तसेच स्थानिक प्रश्नांवर लढणारे, जनसंपर्क मजबूत, प्रभागात चांगले वर्चस्व.
प्रभाग क्र. 2
अ) पवन राघो गेडाम
ब) सुनीता प्रभाकर नैताम
सामाजिक योगदान व सक्रियतेमुळे दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा चांगला पाठिंबा.
प्रभाग क्र. 4
अ) भावना अतुल हजारे
ब) हिमांशू विश्वासराव देशमुख
अनुभवी व तरुण नेतृत्वाचा संतुलित मिलाफ—आघाडीसाठी फायदेशीर समीकरण…
प्रभाग क्र. 5
अ) करिष्मा गजानन भैसारे
ब) राकेश विनायक रत्नावार
युवक आणि महिलांची जोडी; प्रभागात परिवर्तनाची हमी.
प्रभाग क्र. 6
अ) सुलभा सुभाष कावळे
ब) मंगला राजेश भट्टलवार
महिलांचे नेतृत्व; स्वच्छ प्रशासन आणि विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी.
प्रभाग क्र. 7
अ) अपर्णा अनिल खेवले
प्रभागातीलच काय रहिवासी तथा सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे मजबूत उमेदवारी.
प्रभाग क्र. 8
ब) सचिन दिवाकर येणप्रेडीवार
तरुणाईचा ऊर्जावान प्रतिनिधी; विकासाचे नवे मॉडेल मांडण्याची तयारी.
प्रभाग क्र. 12
अ) आशा मुकेश मेश्राम
ब) चंद्रशेखर नरेंद्र नैताम
दलित आणि आदिवासी समाजातील चांगला संपर्क; प्रभागात मजबूत स्थिती.
प्रभाग क्र. 13
अ) तुळशीराम रुषी सहारे
ब) पूजा पंकज जवादे
क) मीनाताई सुरेश बोबाटे
तिन्ही उमेदवारांची लोकप्रियता, अनुभव आणि कार्यशैली—आघाडीला सबळ पाठबळ.
तरुण नेतृत्वाची मोठी एन्ट्री : बिपाशा भुसारे ठरल्या केंद्रबिंदू…
महाआघाडीकडून अध्यक्षपदाची उमेदवार म्हणून बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे यांची निवड ही मोठी राजकीय चाल मानली जाते.
त्या बी.कॉम फाइनलपर्यंत शिक्षित,पर्यावरण संवर्धन, पशुपक्षी संरक्षण या विषयांवर विशेष काम,शहरातील ‘तारांगण कोचिंग क्लासेस’शी जोडलेल्या मोठ्या युवा समूहाचे पाठींबे.यामुळे तरुण मतदारांमध्ये बिपाशांविषयी उत्सुकता आणि सकारात्मकता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
महाआघाडीकडून मजबूत रणनीती; विरोधकांच्या डावपेचांकडे सर्वांचे लक्ष…
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी स्वतंत्र लढत जाहीर केल्यामुळे या निवडणुकीत तिरंगी व चतुर्थी लढतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत शरद पवार गट–मनसे–उद्धव ठाकरे शिवसेना आघाडी हेच निर्णायक ठरणार, अशी चिन्हे स्थानिक राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
महाआघाडीचं पॅनल जाहीर झाल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष विरोधक कोणती रणनीती आखतात, कोणते चेहरे उतरवतात आणि या निवडणुकीत बदलाचा संदेश कोण देणार, याकडे आहे.




