जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सेगंटी कुटुंबाला केली आर्थिक मदत..

0
147

 

नाल्यात पडून गट्टय्या मलय्या सेगंटी चा झाला मृत्यू..!!*

अहेरी : तालुक्यातील कोलपल्ली येथील गट्टय्या मलय्या सेगंटी व पत्नी शेतात गेले असता शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडल्याने गट्टय्या चा मृत्यू झाला होता. सदर बाबा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी कोलपल्ली येथे मृतक गट्टय्या सेगंटी च्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली व पुढील घरगुती कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली.

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात. पद असो अथवा नसो मात्र गरजू व्यक्तींना वेळीच मदतीचा हात पुढे करीत असतात. त्याचप्रमाणे कोलपल्ली येथील घटनेची माहिती मिळताच सेगंटी कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत केली.

यावेळी श्रीनिवास राऊत, महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, दिवाकर आत्राम, पुरुषोत्तम आईलवार, मनोज सडमेक, पोलिस पाटिल बुच्चा आत्राम व आ.वि.स.चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here