Dhule.date 12/9/2022 (maharashtra)
भाजपाचे प्रांताध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर, बावनकुळे प्रथमतःच धुळ्यात आल्याने भाजपाने विशेषतः तेली समाजाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अल्पसंख्याक समाजातील नेता म्हणून आमच्या सारख्या राजकीय विरोधकांनाही, त्यांच्या नियुक्तिबद्दल आनंद झाला आहे.
माणूस मोठ्या पदावर गेला की त्याला मान सन्मान मिळायला लागत़ो. हा मान सन्मान स्विकारतांना , मानसन्मान देणार्यापुढे मान झुकवावी लागते, हा भारतीय स्ंस्कार आहे. पण हल्ली राजकारणातली मंडळी संस्कार विसरत चालली आहेत. पुष्पहार स्विकारतांना मान झुकवायला नको म्हणून पाश्चात्य संस्कृतीच आचरण करीत, आता पुष्प गुच्छ म्हणजेच ,”बुके” स्विकारण्याकडे कल वाढलाय.
बावनकुळे धुळ्यात येणार म्हटल्यावर महापौर प्रदिपनाना कर्पे आणि भाजपाचे ऊमदे अध्यक्ष अनुपभैय्या स्वागताच्या तयारीला लागले.
धुळ्यातील स्वागत पाहून बावनकुळे भारावलेत. त्यात धुळ्यातील तेली बांधवांनी , पक्षभेद विसरून स्वागताला दिलेला प्रतिसाद म्हणजे दुधात साखर पडली.
गल्ली पासून दिल्ली पंर्यत भाजपचाच सध्या जयजयकार होत असल्याने, प्रांताध्यक्ष म्हणून बावनकुळेंची मान ताठ असणे सवाभाविक होते. पण,. राज्यातील लोकांची मने
जोडण्यासाठी बावनकुळे यांना प्रांताध्यक्षपदी नियुक्त केले आहे, मने तोडण्यासाठी नाही हे भारावलेले बावनकुळे विसलेत.
आपलया पक्षाची, अर्थात भाजपाची भूमिका मांडतांना, , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हेटाळणी करतांना त्यांची जीभ घसरली. , राष्ट्रवादीचे बुजुर्ग नेते, शरदपवार यांच्या संदर्भात अभद्र बोलून त्यांनी असंख्य लोकांची मने दुखावलीत, जाती बांधव म्हणून बावनकुळेंचे कौतुक करणारे , राष्ट्रवादी पक्षातील तेली बांधवही, बावनकुळे यांचेवर खप्पा झालेत.
कडवट प्रतिक्रिया ऊमटल्या नंतर बावनकुळे , “आपला बोलण्याचा तसा हेतु नव्हता” ,असा खुलासा करतीलही” , पण तो खुलासा निष्फळ ठरेल, त्यांच्या बोलण्याची किंमत त्यांना मोजवी। लागेल., कारण त्यांचेच सहानुभूतीदार बोलायला लागलेत, ” “बावनकुळे बावचळलेत. “