Home ब्रेकिंग न्यूज   ” पद ” माणसाला आपलं व्यक्तीमत्व सिद्ध करण्याची संधी देत असतं…...

  ” पद ” माणसाला आपलं व्यक्तीमत्व सिद्ध करण्याची संधी देत असतं…   महेशबाबा घुगे.

0
328

प्रबोधन….३/२/२०२३

माणूस कोणता पद विभूषित करतो, या पेक्षा , विभूषित केलेल्या पदाला तो, कसा न्याय देतो, त्यापदाचा तो कसा उपयोग करतो, हे महत्वाचे असते.

कांही वेळा, माणूस ज्या , अधिकार पदाच्या खुर्चीवर बसतो त्या खुर्ची मुळे त्याचा मानसन्मान वाढतो,तर काही वेळा, कर्तबगार, मेहनती , माणसामुळे त्या अधिकार पदाच्य खुर्चीचा मान वाढतो.

“पद” मग ते नोकरी – व्यवसायातले असो की राजकीय , सामाजिक क्षेत्रातले. त्याला विशिष्ठ मान असतो . त्यामुळे “त्या” पदाचा मान कसा राज्य खला जाईल याची धखल सबंधीत पदाधिकार्याने घ्यायला हवी.

” पद” स्विकारल की, मग त्या पदाची गरीमा , त्या पदाच महत्व, त्या पदाच कर्तव्य, त्या पदाचा ऊद्देश, त्या पदा मागची संकल्पना, व त्यापदाच कर्तव्य, त्या पदाच स्थान ,जाणून घेऊन त्यासाठी आवश्यक तो वेळ, आवश्यक ते योगदान द्यायलाच हव. त्यासाठी आवश्यक ती पथ्ये पाळण्याच बंधंन सबंधित पदाधिकार्याने स्वतःवर लादुन घेणही गरजेच असत.

नोकरी व्यवसायातले पद कनिष्ठ असो की वरिष्ठ, तुम्ही , त्या पदाच महत्व लक्षात घेऊन, त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला , तर ते पद तुमच. व्यक्ती मत्व खुलवत असतं. , लोक तुमच्याकडे आकर्षित होत असतात , लोक तूमच कौतुक करायला लागतात. त्या पदामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळते .तुम्ही लोकप्रिय होता. जर तुम्ही त्या पदाचा हेतु, त्या पदाच महत्व डावलुन , पदाचा गैर फायदा घेतला तर लोक तुमचा तिरस्कार करायला लागतात, तुम्ही कुप्रसिद्ध होता.

जिल्हाधिकारी साहेबांचा साधा शिपाई असला व तो त्या शिपाई पदाचे महत्व जाणून वागला, तर लोक , त्या शिपायाला सुद्धा” जिल्हाधिकारी साहेबांचा शिपाई” म्हणून मानपान देतात, त्याच्याशी अदबिने वागतात, त्याच्या बद्दलही , जिल्हाधिकारी साहेबाईतकीच आदरयुक्त भिती निर्माण होते. पण , तोच शिपाई जर, त्या पदाच महत्व विसरुन गैर फायदा घ्यायला लागला की लोक त्याला त्या नजरेतूनच पाहू लागतात.

ऊच्च पदस्थ अधिकार्यानेही पदाचा गर्व न बाळगता ,त्या पदाचा गैरफायदा न घेता, , त्या पदाला न्याय दिला तर तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचतो. असा लोकप्रिय अधिकारी निव्रुत्त झाल्यावरही लोकं त्याला तितकाच मांन देतात, . पदाचा गैर फायदा घेणारा आधिकारी निव्रुत्त झाला की त्याची किंमंत शुन्य होते. लोक त्याला बघुन त्याच्याकडे पाठ फिरवितात.

जी गोष्ठ नोकरीतील अधिकारी पदाची ,तीच गोष्ट राजकारणातील. आमदार, खासदार किंवा मंत्री पदाची.  नशिबाने, किंवा स्वकर्तुत्वाने राजकारणात पद मिळाल आणि त्या पदाच महत्व लक्षात घेऊन ,त्या पदाला न्याय देण्याचा, त्या पदामुळे मिळालेल्या अधिकाराचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर सबंधित ऊच्च पदस्त पदाधिकार्याला आत्मिक समाधान तर मिळतेच , पण पदावरुन पद्च्युत झाला तरी, लोक अशा पदाधिकार्याला तेवढाच मान देतात. त्यामुळे, नशिबाने, किंवा स्व- कर्तृत्वाने पद मिळाले तर त्या पदाचे महत्व, त्या पदाचा हेतु जाणून, प्रामाणिक पणे, कर्तव्य पार पाडण्यात मिळणारे समाधान अनन्य साधारण असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here