गडचिरोली.(देसाईगंज)३/२/२०२३
गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांच्या चळवळीतील एक वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक त्रिकालनेत्र चे संपादक श्री प्रभातकुमार दुबे वय ६८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे चार वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले…
प्रभातकुमार दुबे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठा दबदबा होता,त्यांनी आपली पत्रकारितेत कधीही तडजोड केली नाही,उलट अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी ते अग्रस्थानी राहिले होते.
त्यांच्या निधन पश्चात दोन मुले सुना नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे स्व.प्रभातकुमार दुबे यांच्या चिर समृतीला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे.