Home सामाजिक गडचिरोलीत माता कन्यका परमेश्वरी मंदिराची प्राणप्रतिष्ठा: श्रद्धा, साहस आणि एकतेचे भव्य प्रतीक...

गडचिरोलीत माता कन्यका परमेश्वरी मंदिराची प्राणप्रतिष्ठा: श्रद्धा, साहस आणि एकतेचे भव्य प्रतीक ठरले देवालय…

0
285

 

गडचिरोली : श्री माता कन्यका परमेश्वरी देवी मंदिर येथे आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पावन प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक उपस्थित राहून विधीवत पूजा-अर्चना व आरती केली. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली.

अल्प कालावधीत उभारण्यात आलेले हे भव्य मंदिर श्रद्धा, साहस आणि संघटनशक्तीचे तेजस्वी उदाहरण ठरले आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आर्य वैश्य समाजाने उभारलेले हे देवालय केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि एकजुटीचे प्रतीक म्हणूनही उदयास आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले. याबद्दल आर्य-वैश्य समाजाचे अध्यक्ष प्रशांत तम्मेवार तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आमदार मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोलीच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह हजारो गणमान्य नागरिकांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

आपल्या भाषणात आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले की, हे मंदिर केवळ पूजेसाठी मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत आणि सहकार्य पोहोचविणारे केंद्र बनावे. मंदिर विश्वस्त आणि समाजाच्या माध्यमातून परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

माता परमेश्वरीच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो तसेच समाजसेवेची प्रेरणा सतत मिळत राहो, अशी कामना व्यक्त केली. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचा आदर्श ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here